ब्राम्हणगावात आचारसंहितेचा भंग…? तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष…

ब्राम्हणगावात आचारसंहितेचा भंग…? तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी :- मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला व आदर्श आचारसंहिता लागू केली यानंतर तात्काळ राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सरकारी कार्यालयतील राजकिय नेत्याचे पक्षाचे नाव चिन्हे असलेली फलक झाकली मात्र ब्राम्हणगावात सरकारी मालमत्तेवर राजकीय नेत्यांचे नाव आज पावेतो झाकलेले दिसत नाही. आचारसंहिता लागू होऊनही ते झाकले गेले नसल्याने आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे सर्वाना वेगळा कायदा व ही ब्राम्हणगाव ग्रामपंचायत भाजपकडे आहे यांना हा वेगळा कायदा का असेही जनतेकडून विचारले जात आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रथम नागरिक म्हणून तहसीलदार व गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास अधिकारी या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे.

२०२४ ची लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असुन यासाठी आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे मुख्य निवडणूक आयोगाने निवडणूक आधीसुचना जाहीर करताना अनेक नियम वाचून दाखवले व या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले मात्र ब्राम्हणगावात आदर्श आचारसंहिता भंग करण्यात येत आहे मात्र अद्यापही हे पोस्टर झाकलेले नाहीत यामुळे आचारसंहिता भंग होत असुन याकडे तालुक्यातील तहसीलदार व ग्रामविकास अधिकारी यांचे दोघांचेही दुर्लक्ष आहे आचारसंहिता भंग करणाऱ्यावर हे कारवाई करतील का ..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे मुळात इतराना वेगळा न्याय व भाजप पक्षाला वेगळा न्याय असे शासकीय अधिकारी करतात का ? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे