राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या मूर्ती व मंदिर १२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या मूर्ती व मंदिर १२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या मूर्ती व मंदिर १२ वा वर्धापन निमित्ताने जनार्दन स्वामी मंदिराबरोबरच परिसरात विद्युत आकर्षक रोषणाई बाळासाहेब दोडकर यांनी केली.

दि.१४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने नर्मदा नदीच्या पाण्याने स्वामींच्या मूर्तीचे स्नान व अभिषेक करण्यात आला.

आज पहाटे स्वामींचे मूर्तीचे महापूजा व नित्यनेम विधीपाठ करून सकाळी ९ ते १० वेळेत स्वामींच्या पालकखीचे ब्राम्हणगावात मिरवणूक काढून ह.भ.प विवेक महाराज सोनवणे यांच्या वाणीतून जनार्दन स्वामीच्या जीवनावर प्रवचन होऊन परमपूज्य मठाधिपती रमेशगिरिजी महाराज यांचे सत्संग वर प्रवचन होऊन आमटी – भाकरीचा महाप्रसादचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.

या कार्यक्रमाला अन्नदानाचा मान सुकदेव आसने व सोमनाथ हुळेकर यांना मिळाला.हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी संत जनार्दन भक्त मंडळांनी परिश्रम घेतले