रोशनी साहेबराव शिरोळे वय १९
व
सागर राजेंद्र शिरोळे वय २३
अशी त्या बहीण भावांची नावे आहेत.
या घटनेची शिर्डी पोलीस ठाण्यात सुजाता जितेंद्र आठवले यांनी फिर्याद दिली आहे. Shirdi Police Station
त्यांची बहिण रोशनी साहेबराव शिरोळे वय १९ ही तीन वर्षापासून त्यांच्या घरात राहत होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा चुलत भाऊ सागर राजेंद्र शिरोळे रा. पुणे हा त्यांच्याकडे राहण्यासाठी आला होता.
त्या स्वतः नोकरीवरून घरी परतल्या तेव्हा या दोघांचे मृतदेह त्यांना पाहायला मिळाले. या घटनेबाबत फिर्यादी सुजाता जितेंद्र आठवले वय ३२ रा, सावळीविहीर यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.