WhatsApp चा वापर चांगल्या कामांसाठी कसा करायचा हे ग्रामीण भागातली जनता चांगलीच जाणते आहे.
श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन येथून एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा Whatsapp मुळे फक्त काही तासातच शोध लागला आहे.
कसा लागला शोध -
हरेगाव फाटा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. तर ह्या मुलीच्या अपहरणर्त्यां चे फोटो आणि त्याच्या गाडीचे फोटो WhatsApp व इतर समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले, त्यामुळे पोलिसां चा तपास देखील गतिमान झाला .
अपहरण झालेली मुलगी पांगरी (जि. नाशिक) येथे असल्याची माहिती त्यामुळे पोलिसांपर्यंत पोहोचली, त्यांनतर त्या मुलीला तात्काळ वडिलांच्या सुपूर्द केले गेले.
मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
यात त्या अज्ञात लोकांचा देखील समावेश आहे ज्यांनी मुली बद्दल ची व अपहरणर्त्यां ची माहिती Good Forward म्हणून Forward केली..
अशा सर्व व्यक्ती अभिनंदनास पात्र आहेत.
नक्की वाचा -