Savali Vihir Shirdi Truck Driver सावळी विहीर : ट्रक चालविण्याच्या वादातून ट्रक ड्रायव्हरचा खुन

नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) सावळीविहीर (Savalivihir) नजीक ट्रक (Truck) चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद (Dispute) होवून एकाचा खुन (Murder) केल्याची घटना घडली असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास शिर्डी पोलिसांकडून अटक (Shirdi Police Arrested) करण्यात आली आहे.

याबाबत थोडक्यात समजलेली माहिती अशी की, नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) काल शुक्रवार दि. 11 रोजी अकलूज (Akluj) येथून भरलेला मालट्रक क्रमांक एमपी-09 एचएच-9264 इंदोरकडे (Indore) जात असताना राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) सावळीविहीर (Savalivihir) फाट्यानजीक चालू गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन ट्रकचालक मालट्रक घेऊन थेट कोपरगाव पोलीस स्टेशनला हजर झाला. मात्र सदरील घटना शिर्डी पोलीस ठाणे (Shirdi Police Station) क्षेत्रात घडल्याने कोपरगाव पोलिसांनी (Kopargav Police) आरोपी रमेश मदन राऊत यास शिर्डी पोलिसांच्या (Shirdi Police) हवाली केले. तात्काळ शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
आरोपी रमेश मदन राऊत याची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत ट्रकचालक रामसिंग, रा. इंदौर, मध्यप्रदेश याचेबरोबर गाडी चालवण्यावरून वाद झाल्याने कॅबिनमधून रॉड आणि व्हिल पान्हा डोक्यात मारून त्याचा खून करुन मृतदेह नगर-मनमाड महामार्गावर सावळीविहीर नजीक फेकण्यात आले असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

सदरचा मालट्रक शिर्डी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून ट्रकच्या कॅबिनमधून हत्येसाठी वापरलेले रॉड, लोखंडी पान्हा व इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपी रमेश मदन राऊत याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास शिर्डी पोलीस तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके करत आहे.