सध्या सोशल मिडीयावर सामी सामी गाण्यावरचे डान्स तुफान वायरल होत आहेत. पुष्पा या चित्रपटातील गाण्याची छाप लहांनापासून मोठ्यांवर सुद्धा चांगलीच पडली आहे. सामी सामी हे गाणे "पुष्पा" या प्रसिद्ध तेलगू चित्रपटातील आहे. तेलगू भाषेतून त्याचे हिंदी व मराठीत सुद्धा व्हर्जन तयार झाले.हिंदी व मराठीत बनलेले गाणे सुद्धा प्रचंड वायरल झाले होते.अनेक तरूण तरूणी,मुलं मुली छोटे छोटे विडीओ या गाण्यावर बनवत आहेत. सगळ्या भाषेत हे गाणे बनले होते फक्त आदिवासी भाषेत बनले नव्हते. आता हे गाणे आदिवासी भाषेत बनले आहे.
पावरा परिवाराने तयार केले सामी सामी गाण्याचे आदिवासी व्हर्जन
सुशिलकुमार पावरा यांनी सामी सामी या गाण्याचे आदिवासी पावरा भाषेत भाषांतर केले आणि आपल्या स्वतःच्या आवाजात गायले.या गाण्यावर त्यांची 7 वर्षाची कन्या परी पावरा हिने छान नृत्य केले आहे.या गाण्याचे कोरोयोग्राफर परीची आई पिंगला पावरा यांनी केले आहे.गाणे गाणारे वडील, नृत्य करणारी मुलगी व कोरोयोग्राफर आई असे पावरा परिवारातर्फे या आदिवासी गाण्याची निर्मिती केली गेली आहे. त्यामुळे पावरा परिवाराच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे दापोली येथील पांगारवाडी -गव्हे या डोंगराळ परिसरात या गाण्याची शुटींग्ज करण्यात आली आहे. आदिवासी नववारी साडी,आदिवासी दागिने, आदिवासी भाषा,आदिवासी कलाकार,निसर्ग रम्य ठिकाण यामुळे या गाण्याला एक वेगळेपण प्राप्त झाले आहे. प्रेषक या सामी सामी आदिवासी व्हर्जन गाण्याला आवडीने पाहत आहेत.