आपण अनेक स्पाय एजंटच्या गोष्टी आजपर्यंत ऐकल्या असतील. आज आम्ही आपल्याला भारतीय गुप्तचर खात्यातील अशाच एका स्पाय एजंटची गोष्ट सांगणार आहोत. असा स्पाय – ज्याचा पुर्ण जीवनपट आपण वाचला किंवा पाहिला तर आपल्याला ते कोणत्यातरी हॉलीवूड पटातील हिरोपेक्षा कमी वाटणार नाहीत.
त्यांच्या विषयी काही ज्ञात अज्ञात फॅक्टस
1 )अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
2) २०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती.
3) १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
4) १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.
5) उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
6) इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे.
7) २०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत
8) दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी संघटनांच्या तळांना हवाई दलाच्या विमानांनी लक्ष्य केले असून या तळांवर सुमारे २१ मिनिटे बॉम्बचा वर्षाव सुरु होता, असे समजते. या कारवाईनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
त्यामुळं अजित डोभाल यांचं काम हे, निश्चितच या राष्ट्रासाठी प्रेरणादायी असं काम आहे. ज्या तरूणांना देशासाठी काम करण्याची इच्छा आहे. देशासाठी काहीतरी थ्रील आणि धाडसी काम करायचंय त्यांनी खरंतर अशा प्रकारचा मार्ग चोखाळायला हरकत नाही.