चणे फुटाणे विकणाऱ्याचं 'कच्चा बदाम' गाणं सध्या इंस्टाग्रामचं टेम्परेचर वाढवतंय !

आपल्या भारतात मागच्या काही दिवसात बसपन का प्यार प्रमाण एक गाणं व्हायरल झालं ते होत एका फेरीवाल्याचं कच्चा बदाम. सोशल मीडियात इतकी ताकद आहे की ती सामान्य माणसाला सेलिब्रिटी बनवू शकते त्याचा हा आणखी एक डेमो. वेस्ट बंगाल मध्ये एका चणे फुटाणे विकणाऱ्या भिडूने त्याचा माल विकला जावा म्हणून एक जिंगल बनवली आणि तीच जींगल अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
भुबन बाद्याकर असं या भिडूच नाव आहे आणि सायकलवर आपला बिझनेस घेऊन तो फिरतो. गावोगाव फिरून तो आपलं पोट भरतो पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याचा आवाज आणि माल विकला जावा म्हणून गात असलेलं गाणं. बदाम बदाम कच्चा बदाम म्हणत तो आपला माल विकतो. आता एवढी भारी रिंगटोन असल्यावर साहजिकच लोक आवडीने त्याच्याकडून शेंगदाणे फुटाणे विकत घेतात.
    सायकलच्या कॅरीअरला मोठी पांढरी पिशवी अन् त्यात चणे फुटाणे भूबन विकतो. असच एका गावी गेलं असताना एका जणाने त्याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. झपाट्याने हा व्हीडिओ व्हायरल झाला आणि याचा इतका प्रचंड परिणाम झाला की हे गाणं you tube वर ट्रेण्ड झालं. यावर काही लोकांनी गाणं सुध्दा बनवलं.
दिवसाला 250- 300 रुपय कमावणारा भूबन एका झटक्यात सेलिब्रिटी झाला आणि आपला देश अश्या गोष्टी पटकन पिकप करतो. आजही you tube वर चांगल्या संख्येनं भुबनचं गाणं गाजतय.