Anand Mahindra Tweet: जिथे भारतीय व्यक्ती असेल तिथे सण- समारंभ होणारच हे काही वेगळं सांगायला नको. कोणत्याही सणाच्या महिनाभर आधी व चार दिवस नंतरही उत्साह दांडगा असतो. अलीकडेच केरळसह देशभरात ओणम साजरा करण्यात आला. दोन वर्षानंतर होणाऱ्या सणाच्या निमित्ताने केरळच्या सरकारने एक आठवड्यासाठी ओणम सेलिब्रेशनचे नियोजन केले होते. याच पार्श्वभूमीवर एक अनोखं ओणम सेलिब्रेशन महिंद्रा समूहाचे संस्थापक आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर शेअर केलं आहे. निर्मनुष्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंटार्क्टिकाला काही हौशी भारतीयांनी अलीकडेच पारंपरिक पद्धतीने पण बर्फावर ओणम साजरा केला. हे सुंदर दृश्य नक्कीच पाहण्यासारखे आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, काही भारतीय अंटार्क्टिकामध्ये पुकलम नावाने ओळखले जाणारे फ्लॉवर कार्पेट कोरताना दाखवले आहेत, आनंद महिंद्रा यांनी बर्फावर कोरलेल्या सुंदर फुलांच्या व्यवस्थेचा व्हिडिओ शेअर केला आहे. महिंद्रांनी आपल्या प्रियजनांसह भारतात परत येऊ न शकलेल्या लोकांच्या प्रतिकात्मक सोहळ्यातील निखळ सौंदर्याचे कौतुक केले आहे.
व्हिडीओ शेअर करताना “तुम्ही भारतीयांना ओणम साजरा करण्यापासून रोखू शकत नाही. अगदी अंटार्क्टिकामध्येही. मस्त,” असे कॅप्शन महिंद्रांनी दिले आहे. (Anand Mahindra Tweet: लग्नात ‘पापड युद्धा’वरून आनंद महिंद्रा यांनी सुरु केली मजेशीर स्पर्धा, रितेश देशमुखचा सहभाग)
अंटार्क्टिकामध्ये ओणम सेलिब्रेशन
दक्षिण भारतामधील केरळ मध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे. शेतात पीक वाढू लागल्याच्या आनंदात १० दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला ‘अथम’ आणि शेवटच्या दिवसाला ‘थिरुओणम’ असे म्हटले जाते.
ओणम महापर्वाच्या मागे एक ऐतिहासिक मान्यता सुद्धा आहे. राजा महाबली याच्या आदरार्थासाठी ओणम हा सण साजरा केला जातो. उत्तम पीक यावे यासाठी ओणम हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.