कोल्हे कारखान्याने जिल्हयात सर्वप्रथम मिळवले आयएसओ मानांकन


सतत सुधारणा ही निरंतर कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया असुन काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम जागतिक आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त केले असुन त्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे आयएसओचे रिजनल मॅनेजर शिवराम सोहनी यांनी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना नुकतेच प्रदान केले. अत्याधुनिकतेचा मुलमंत्र सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने आत्मसात करत ते आमच्याशी जोडले गेले असेही सोहनी म्हणाले.         
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार  प्रास्तविक करतांना म्हणाले की, आयएसओ ९००१-२०१५ हे जागतिक पातळीवरील गुणवत्ता व्यवस्थापन असुन त्यामुळे आपले उत्पादित होणारे प्रॉडक्ट जागतिक पातळीवर गुणवत्तेच्या कसोटीवर विक्री करता येणार आहेत तसेच आयएसओ मुळे निरंतर सुधारणा करण्यासाठी सर्वांनी सामुहिकपणे प्रयत्न करून संस्थेच्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता व सातत्य ठेवण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे ते म्हणाले. सचिव तुळशीराम कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.           
तज्ञ संचालक विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सध्याच्या खुल्या अर्थव्यवस्थेत स्पर्धेला विशेष महत्व असुन सहकार क्षेत्राला त्याला सामोरे जातांना असंख्य मर्यादा येतात परंतु काळाच्या पुढे दोन पावले पुढे जायचे ही शिकवण माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सर्व संचालक मंडळाने दिली असुन त्यानुरूप कोल्हे कारखान्यांचे नांव अग्रमानांकित राहण्यासाठी आपण जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहोत.          
बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने ६० वर्षात अनेक स्थित्यंतरांना तोंड देत दैनंदिन गाळप क्षमता वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड, विविध रासायनिक उपपदार्थ, सहवीज निर्मीती, ज्युस दु इथेनॉल, बायोगॅस व त्यावर आधारीत सहवीज निर्मीती, आसवनी प्रकल्प, पॅरासिटामॉल औषध निर्मिती, उच्च प्रतिचे उसबेणे हेक्टरी सर्वाधिक उस उत्पादकता, कंपोस्ट खत आदि सर्वच बाबतीत कोल्हे कारखाना राज्य व देशात अव्वल कसा राहिल यासाठी सक्षमतेने वाटचाल सुरू आहे, आजवर राज्य व राष्ट्रीय स्तरावर असंख्य बक्षिसे पटकावली आहेत. विविध सामाजिक प्रश्नांत योगदान देत मदतीचा हात सर्वप्रथम पुढे केला आहे.      

याप्रसंगी संचालक सर्वश्री. साहेबराव कदम, अरूणराव येवले, संजय होन, शिवाजीराव वक्ते, निवृत्ती बनकर, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव औताडे, प्रदिप नवले, मनेष गाडे, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, मच्छिंद्र लोणारी, सोपानराव पानगव्हाणे, कामगार नेते मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, आयएसओ समितीचे ब्रॅच मॅनेजर प्रसाद कुलकर्णी, विक्रम कापडे, बाळकृष्ण पांचाळ, चीफ इंजिनियर कुशलेशकुमार शाक्य, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, डिस्टीलरी मॅनेजर राधाकृष्ण जंगले, केमिकल प्रॉडक्शन मॅनेजर टी. व्ही. देवकर, को जन अधिकारी ए. बी. बाहुबली, कंट्रीलिकरचे पी. एन. पदiडे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आदि उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.