ग्रामपंचायत वेळापूर ची ग्रामसभा इतिहासात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन !

वेळापूर गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी मधुकर पगारे, सरपंच सौ वैशाली सतीश भोसले व उपसरपंच सतीश दिगंबर बोरावके यांनी दिली आहे. तर ऑनलाईन ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत वेळापूर चे सदस्य गणपत धोंडीराम गोरे, निलेश शिवाजी काळे, संकेत बाळासाहेब मेहेत्रे,  दीपक गोरख पवार, रोहिणी रावसाहेब मोकळ सविता एकनाथ शिंदे, अनिता अरुण खुरसने, उषा अशोक पवार, काटे यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध कार्यकारी सोसायट्यांच्या वार्षीक सर्वसाधारण सभाही ऑनलाईन होत असताना आता गावोगावच्या ग्रामसभा ऑनलाईन होणार आहेत.
दरम्यान या ग्रामसभेची लिंक ग्रामपंचायत वेळापूर ने तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाठविण्यात येणार आहे, सभेच्या एक तास अगोदर म्हणजेच सकाळी दहा वाजता गावातील विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविली जाणार असल्याचे ग्रामसेवक श्री मधुकर पगारे यांनी सांगितलेे.
यामध्ये तांत्रिक बाबी दिनेश कुयटे व प्रदीप भगत हे सांभाळणार आहेत.