हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती , निमित्त कोपरगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सदैव मराठी माणसाच्या हितासाठी कार्य केलं असून त्याला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत होते.२३ जानेवारीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अाहे.कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या वतिने साजरी केली जाणार आहे.
 कोपरगावात या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 शहरातील बसस्थानकासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विविध सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम रावबुन जयंती साजरी केली जाणार आहे. 
बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त कोपरगाव शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच कोठारी हॉस्पिटल -आर्थोपेडिक इन्टेसिव्ह केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपालिकेतील आरोग्यसेवक व कर्मचाऱ्यासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन रविवार दि.२३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. 

जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे नगरपालिकेतील आरोग्यसेवक व कर्मचार्यासाठी प्रथमचं अशा स्वरूपाचे शिबीर घेण्यात येत आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शिबीर हे कोठारी हॉस्पिटल वैद्यकीय श्रीराम मंदीर रोड,छत्रपती संभाजी राजे चौक, कोपरगाव येथे २.०० संपन्न होणार आहे अशी माहिती शिवसेना मदत कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. 

कोपरगाव शहरातील स्वराज्य हनुमाननगर शाखा क्र.५ व संजीवनी ब्लड बँकेच्या वतिने २३ जानेवारी सकाळी ९ वा.हनुमाननगर हनुमान मंदिर या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,माजी शहरप्रमुख भरत मोरे,शिव वाहतुक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख,यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ जानेवारी रोजी स्वराज्य सेना शाखा क्र.५ व संत जर्नादन स्वामी हाँस्पीटलच्या वतिने मोफत सर्वरोगनिदान शिबिर संपन्न झाले आहे.युवती सेने तर्फे गोरगरिबांसाठी ब्लँकेट वाटप केले जाणार आहे.


शहरात विविध ठिकाणी शिवसेना शाखेचे उदघाटन सोहळा आयोजित केला आहे.प्रभाग क्र. २ मध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन,तसेच राजे प्रतिष्ठानच्या वतिने भव्य रांगोळी स्पर्धा अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी दिली आहे.