राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्या नंतर ना. आशुतोष काळे यांनी घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांची भेट

महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे.

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यमंत्री दर्जा मिळाल्यानंतर आज मुंबई येथे पद्मविभूषण आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन  ना. आशुतोष काळे यांनी आशिर्वाद घेतले.