कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी-सुरेगाव शिव परीसरातील शेतांमध्ये बिबट्या दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.सध्या या परीसरात उस पिके मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच कांदा लागवड सुरु यामुळे पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे गव्हाला देखील पाणी उभे राहुनच भरावे लागते पण आता बिबट्या दिसल्याने कामगारांमध्ये भीती पसरली आहे . गेल्या ४/५ दिवसांपासून तर बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे.या परीसरातील बिबट्याच्या पायाचे ठसे येथील शेतकऱ्यांनी बघितले
आहेत.या परीसरातील कोळगाव थडीचे उपसरपंच सुनिल चव्हाण,माजी सरपंच कैलास लुटे, भाऊसाहेब लुटे व प्रकाश बबनराव कोळपे या शेतकऱ्यांनी सदर प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या परीसरातील ग्रामस्थांची आहे.