रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर, गौतमनगर येथे सौ. सुशिलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण आज मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरूजी कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांतजी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. आय.के. सय्यद, आबाजी आभाळे, मढी खुर्दच्या माजी सरपंच सौ. वैशालीताई आभाळे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कल्याणराव सोनवणे, उपप्राचार्य सुरेशजी कातकडे, पर्यवेक्षक श्री. तुपे, संवत्सर विद्यालयाचे प्राचार्य जनार्दनजी खरात, कोतुळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथजी रहाटळ, पर्यवेक्षक उत्तमराव पाळंदे, उपप्राचार्य मधुकरराव गोडे, पर्यवेक्षक रमेशजी मोरे, ज्युनियर विभाग प्रमुख अंगदजी काकडे, माजी शिक्षक पांडुरंगजी दिघे आदींसह विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.