गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश्य लक्षणे जाणवत होती. मात्र आता चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती काळे यांनी ट्विटरवर दिलीय. तसेच मी लवकरच बरा होईल. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी, व काळजी घ्यावी. श्री साईबाबा व आपणा सर्वांचे आर्शिर्वाद काही कारण नाही. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.