भरारी पथकाने केली कोल्हे कारखान्याच्या वजन काट्यांची तपासणी



सध्या उस गळीत हंगाम सुरू असुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उस वजन काटयाची मंगळवार दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी अचानकपणे वैद्यमापन विभागाचे भरारी पथकाने तपासणी करून जिल्हा उपनिरीक्षक नि. प्र. उदमले व प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर कार्यालयाचे विशेष लेखा परिक्षक बी. पी. सोनटक्के व तहसिल कार्यालयाचे प्रतिनिधींनी सर्व उस वजन काटे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे यांनी दिली.

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे व अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, त्याचप्रमाणे तज्ञ संचालक विवेक कोल्हे व सर्व संचालक मंडळ हे सभासद शेतकरी व कार्यक्षेत्रातील तसेच बाहेरील शेतक-यांच्या उस वजनाची तंतोतंत अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्नशिल आहेत.

 

याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, कोपरगांव वजन मापे नोंदणी निरीक्षक नंदकिशोर भावसार, कोपरगांव तहसिल कार्यालयाचे वाय. बी. तागडे व संबंधीत उस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

कारखान्यांच्या संवत्सर कार्यक्षेत्रातील शेतकरी राजेंद्र बाबुराव भाकरे व विजय नानासाहेब काळे यांच्या शेतातुन तोडुन आणलेल्या उसाचे वजन त्यांच्या समक्ष करण्यात आले ते बिनचुक भरले.