राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा सत्कार

महाराष्ट्र शासनाकडून राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगरच्या वतीने दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे.
काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.