कोपरगाव मधील सुरू असलेल्या विकास कामांची गुणवत्ता तपासावी, विवेक कोल्हे यांची मागणी


कोपरगाव शहरातील रस्त्यासह विविध विकासकामे होत आहेत माञ एका दिवसात झालेला रस्ता उखडला जातोय. जनतेचा पैसा वाया जातोय तेव्हा शहरात होत असलेल्या विकास कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केली. 

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच अर्थात गावभागातील विकास कामाचा शुभारंभ कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना विवेक कोल्हे बोलत होते. 
सर्वप्रथम स्व. बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई, नगरसेवक योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,गोंदीयाचे  शिवसेना संपर्कप्रमुख निलेश  धुमाळ, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, नगरसेवक कैलास जाधव, जनार्दन कदम,अतुल काले, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,मा.शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, आरपीआयचे जितेंद्र रणशूर  राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, बबलू वाणी,बाळासाहेब आढाव,यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. 

कोल्हे पुढे म्हणाले की, शहरातील निकृष्ट रस्त्याच्या कामावरुन सध्या वादंग उठले आहे. ही अवस्था होवू नये. योग्य दर्जाचे विकासकामे झाले पाहीजे या शुध्द भावनेतून २८ विकास कामापैकी केवळ तीन विकास कामांना आमच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता पण विरोधकांनी जनतेत आमच्याबद्दल गैरसमज पसरवला. 


आमचा विकास कामांना विरोध कधीच नव्हता आणि राहणार नाही. सध्या दर्जाहीन सुरु असलेल्या कामाचा दर्जा वाढवावा. झालेल्या कामांची गुणवत्ता तपासावी.  पुर्ण केलेला रस्ता केवळ एका दिवसात उखडतो कसा अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई म्हणाल्या की, आता जनतेच्या लक्षात येते की, विकासाच्या नावाखाली दर्जाहीन कामे चालु आहेत. आम्ही सेना-भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात विकास कामांना कधीच विरोध केला नाही. फक्त विकासाच्या नावाखाली जनतेची लुट होवू नये याला आमचा विरोध होता. माझ्या कारकिर्दीत झालेले रस्ते पाचवर्षे टिकले पण आता केले रस्ते एक दिवसात उखडले. रस्त्याची हि दुरावस्था पाहुन  खुप वाईट वाटते. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल म्हणाले, विरोधकांनी आमच्या बद्दल गैरसमज पसरवला. पण जनतेने विरोधकांची पोलखोल झालेल्या रस्त्याच्या कामावरून केली आहे. विकासकामांना विरोध करणारे आम्ही मुळीच नाही फक्त जनतेचा पैसा वाया जावूनये व दर्जेदार कामे झाली पाहीजे ही अपेक्षा आहे. म्हणूनच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गावभागातील मानाच्या वेशीच्या कामाला १० लाखाचा निधी कमी पडतो त्यातुन वेशीचे काम दर्जेदार होणार नाही तेव्हा वाढीव निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला आणि गावच्या वेशीला वाढीव निधी मिळवून दिल्याचे योगेश बागुल यांनी सांगून कोल्हे यांचे आभार मानले. 


कार्यक्रमाला विक्रमादित्य सातभाई, कैलास खैरे, बालाजी गोर्डे, ज्ञानेश्वर गोसावी, अनिल जाधव,खालिक कुरेशी, अल्ताफ कुरेशी, जयश बडवे, सिध्दार्थ शेळके, गणेश जाधव,निलेश बोऱ्हाडे, पप्पू पडियार, रंजन जाधव, चंद्रकांत वाघमारे,युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, उपशहरप्रमुख नितीश बोरुडे, उपतालुकाप्रमुख सागर फडे,  कुणाल लोणारी, अमोल शेलार, वसीम चोपदार, विजय भोकरे, अमित बांगर, प्रितेश जाधव, शुभम भावसार,निखिल जोशी, हेमंत गोसावी, गौरव लहुरीकर, ऋषीकेश धुमाळ, अक्षय शेलार, आशिष निकुंभ, सनी काळे, रोहन दरपेल, शंकर बिऱ्हाडे, फकीरमंहमद पहिलवान, श्रीकांत बागल, राहुल मोरे, अहमदभाई बेकरीवाले, कैलास शेळके यांच्या सह भाजपा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.