आमदार काळेंनी व्यक्त केले मतदार संघातील मतदारांचे व महायुतीचा घटक पक्षाचे आभार
कोपरगाव प्रतिनिधी – नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया संपन्न होऊन संपूर्ण राज्यात महायुतीला निर्विवाद वर्चस्व मिळाले असून यात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आशुतोष काळे दुसऱ्यांदा अत्यंत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मतदारांनी महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना तब्बल १ लाख २४ हजार ६४२ इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार आशुतोष अशोकराव काळे यांनी संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार राजाचे तसेच या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत सर्वांचे धन्यवाद मानले आहे