शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी सुरेश आसने
कोपरगाव- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने मोठी उभारी घेतली असून दररोज नवनवीन पक्ष प्रवेश होऊन पदाधिकाऱ्यांच्या पक्ष संघटनेत नियुक्ती केली असून नुकतीच कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी सुरेश आसने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सुरेश आसने हे ब्राह्मणगाव येथील असून त्यांना सदरचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे कोपरगाव तालुकाध्यक्ष बापू रांधवणे यांच्या हस्ते देण्यात आले.