‘स्कूल चले हम’ राज्यातील शाळा आज पासून होणार सुरू; विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
कोपरगाव प्रतिनिधी -: राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज पासून सुरू झाली आहे. आज विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता शिंदे यांनी जंगी स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत.कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी. माणुसकी जपावी असा सल्लाही मुख्याध्यापिका यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरुण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे मुख्याध्यापिका म्हणाले. उपस्थितीच्या हस्ते विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले
यावेळी जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भिमराज पांडुरंग सोनवणे,सचिव जगनराव आहेर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर ,सहसचिव सचिन सोनवणे सर मुख्याध्यापिका श्रीम. शिंदे मॅडम,पालक सुदामराव बनकर सूत्र संचालन एस के आहेर सर यांनी केले.