आनंदा बनकर दाम्पत्याला रेणुका देवीची पूजा करण्याचा मान
कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राम्हणगावातील रेणुका माता देवीच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. रेणुका देवीची यात्रा बरीच प्रसिद्ध असल्याने देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविक ब्राम्हणगावात दाखल होत असतात. पहाटे ४ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडले आहे.
याठिकाणी धारणगाव येथील दक्षिण वाहिनी असलेली गोदावरी नदीतून कावडी भरून आणतात या वेळाचा मान प्रगतशील शेतकरी आनंदा पंढरीनाथ बनकर यांनी २ लाख १२ हजारांचा लिलाव घेऊन त्यानी पूजेचा व कावडीचा मान घेतला असून कावडी भव्य मिरवणूक काढण्यात आली .रेणुका देवीची यात्रा ही तीन दिवस भरणार असून यात लोकनाट्य तमाशा कुस्ती , लाठी काठी व भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे.