बिबट्याच्या हल्ल्यात विष्णू वर्पे यांच्या दोन शेळ्या फस्त
कोपरगाव प्रतिनिधी : टाकळी (ता.कोपरगाव ) येथील वर्पे वस्तीतील एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांना बिबट्या प्राण्याने फस्त केल्याची घटना (मंगळवारी) रात्री घडली आहे.विष्णू लहानु वर्पे यांच्या गट न ७७/२ मध्ये दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत .
मागील काही महिन्यापूर्वी टाकळी ,ब्राम्हणगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कुत्र्यांची शिकार केली होती. तसेच गावातील अनेक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहीले होते. यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. परंतु बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. यानंतर त्या परिसरातून बिबट्या निघून गेल्याचे सांगण्यात आले.तरी या परिसरात पुन्हा पिंजरे लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाला केली आहे