शिवमहापुराण कथा श्रवणाने मन:शांती व जीवनाचे सार्थक – वासुदेवजी आर्वीकर
कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे दि ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत शिवमहापुराण कथावाचक वासुदेव महाराज आर्वीकर यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले.
शिव महापुरानात २४ हजार श्लोक आहेत. हे सर्वसाधारण पुराण नाही. यातील एक शब्द देखील जीवन सार्थकी लावतो. त्यामुळे शिवमहापुराण कथा जीवनाचे सार्थक करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शिव महापुराण कथाकार वासुदेव आर्वीकर यांनी केले.शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर प्रत्येकव्यक्तीला मनशांती मिळते, भगवंताचे नामस्मरण करावे. याेग्य संस्कार जीवनाला दिशा देतात, असा उपदेशही वासुदेव महाराजांनी दिला.सदर प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी दि.८ ऑक्टोबर रोजी भेट दिली
शिवजन्माची कहाणी तसेच शिवपुराणातील अनेक कथा त्यांनी उलगडून दाखवल्या. यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे .