Talathi Bharti 2022 महाराष्ट्रात तलाठी भरती होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय..!!



👨🏻‍🎓 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे.


किती जागांसाठी होणार भरती?


राज्यात तलाठ्यांच्या 3110 पदांसाठी, तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 पदांसाठी भरती होणार आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबतची जाहिरात निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
📝 गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात तलाठी भरती झालेली नाहीये. ठाकरे सरकारने तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा तलाठी भरतीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

👨🏻‍💼 'एमपीएससी'मार्फत तलाठ्यांच्या 3110 जागांसाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.