T20 World Cup : रोमांचक स्थितीत पोहोचलेल्या T20 वर्ल्ड कप टीम इंडियाने आता पर्यंत जबरदस्त क्रिकेट खेळत आहे. भारतीय संघ सेमी फायनल फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारताला आपला शेवटचा ग्रुप सामना खेळायचा बाकी आहे.
या सामन्यात विजय प्राप्त करताच भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचेल.
मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारीने ट्विट केले की, या सामन्यात भारतीय संघ झिम्बाब्वेकडून पराभूत झाला तर ती झिम्बाब्वेतील मुलाशी लग्न करेल.
सहारने जे ट्विट केले आहे ते व्हायरल झाले आहे, भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सामना खेळत असताना, त्यादरम्यान सहार सतत ट्विट करत होती आणि टीम इंडियाचा पराभव व्हावा, अशी इच्छा व्यक्त करत होती , पण तसे झाले नाही. आता सहारने ट्विट करून लिहिले की, पुढच्या सामन्यात जर झिम्बाब्वेने भारताला चमत्कारिकरित्या हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन.