राजस्थानमधील जोधपूर पोलिसांनी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओमध्ये आपल्या वयस्कर बापाला मारहारण करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर या व्यक्तीने आपल्या बापाला बेदम मारहाण केली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
आरोपी मुलाने आपल्या वडिलांना रविवारीही मारहाण केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशाच पद्धतीने वडिलांना मारहाण करतानाची दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी सीआरपीसी १५१ अंतर्गत या व्यक्तीला अटक केली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी रत्नदा पीएस यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
आऱोपी मुलगा पोलिसांच्या अटकेत असून पुढील तपास सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.