खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितली नगर - मनमाड रस्त्याची 'तारीख'


जानेवारी २०२१ मध्ये ४३० कोटी रुपये मंजूर होऊन ठेकेदाराने काम सुरू केले. • मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे १३ जुलै २०२२ रोजी ठेकेदाराचे काम रद्द करण्यात
आले होते.

८ ऑगस्ट २०२२ रोजी खड्डे बुजविण्यासाठी (दुरुस्तीसाठी) पहिल्या टप्प्यात ८.६२ कोटी व दुसऱ्या टप्प्यात ६ कोटी असे एकूण १४.६२ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार कडून मंजूर करण्यात आला व त्या अनुषंगाने आज अखेर ७५% रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल.
या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी नव्याने ७९८ कोटी म्हणजेच जुन्या टेंडर पेक्षा ८५% जास्त निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

• २२ डिसेंबर २०२२ नंतर या रस्त्याची नवीन निविदा उघडली जाऊन जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात नवीन ठेकेदार नियुक्त केला जाईल व रस्त्याचे काम सुरू होईल.