हे व्हिडिओ तिने शिमल्यात राहणाऱ्या आपल्या मित्राला पाठवले. त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस येताच 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्री अडीचच्या सुमारास ही घटना समजताच पोलीस तेथे पोहोचले. मात्र, संतप्त झालेल्या विद्यार्थिनी पोलिसांवरही भडकल्या.
त्यांनी पोलिसांना विरोध करत त्यांच्या वाहनांची तोडफोडही केली. व्हिडिओ पुढे पाठवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या कॅम्पसमधील वातावरण तणावपूर्ण आहे.
व्हिडिओ बनवण्यामागचे उद्देश जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सातत्याने विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू काय आहे. विद्यार्थिनी अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ बनवत होती.
हे व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश काय होता? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिमल्यात राहणाऱ्या आरोपी मित्राला पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही मुलगी आणि मित्र दोघेही हिमाचलचे आहेत. या दोघांनी असे का केले? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
1/N
इसी छात्रा पर तक़रीबन 60 लड़कियों के छिपकर नहाते हुए वीडियो रिकॉर्ड कर पुरूष मित्र को भेजने के आरोप लगे हैं। #chandigarhuniversity #justiceforCUgirls pic.twitter.com/CLoLluXDIy— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) September 17, 2022
चंडीगढ़ यूनिवर्सिटी में पूरी रात हॉस्टल की लड़कियों के अश्लील वायरल वीडियो को लेकर मचा रहा हंगामा।
खूप दिवसांपासून व्हिडिओ बनवत होती
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही तरुणी बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. हे व्हिडिओ शिमल्यातील तिच्या मित्राला पाठवत होती. त्या मित्राने आता हे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. हे समजताच मुलींचा राग अनावर झाला.