फ्लॅटमेटच्या एका चुकीचा फोटो शेअर करताच ट्विटरवर सुरू झाला नवा वाद; पाहा नेमकं काय घडलं

जेवण बनवता येते का? फ्लॅटमेट शोधताना कदाचित हा प्रश्न सर्वात आधी विचारला जात असेल. कारण एकट्या व्यक्तींना रोजरोज बाहेरचे खाऊन नक्कीच कंटाळा येत असेल. त्यात जर दोन जण एका घरात राहत असतील आणि जर दोघांनाही स्वयंपाक येत नसेल तर त्याचे भन्नाट किस्से तुम्ही ऐकलेच असतील. स्वयंपाक न येणाऱ्या मंडळींचे जेवणाबाबतचे ज्ञान फारच मोजके असते. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्यासोबत हास्यास्पद किस्से घडतात जे लगेच व्हायरल होतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. याबरोबरच या फोटोवरुन ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे. काय आहे या फोटोचा अर्थ आणि त्यावरील वाद जाणून घेऊया.

रक्षित बवेजा या व्यक्तीने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोत फ्रिजमध्ये ठेवलेला कुकर आणि पॅन दिसत आहे. या फोटोबरोबर असलेल्या कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘फ्लॅटमेटला मी उरलेले वरण आणि भात फ्रिजमध्ये ठेवायला सांगितला होता. सकाळी उठल्यावर मला हे दिसले, गुड मॉर्निंग!’ फ्लॅटमेटने उरलेले जेवण दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणे अपेक्षित होते, पण त्याने चक्क सगळे जेवण तसेच्या तसे फ्रिजमध्ये ठेवले त्यामुळे या व्यक्तीला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने शेअर केलेला फोटो पाहा.

आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र

व्हायरल पोस्ट :

ही पोस्ट पाहून ट्विटरवर दोन गट पडले आहेत. काही जणांनी हे बरोबर असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हे चुकीचे असल्याचे म्हणत या पोस्टचे समर्थन केले आहे. नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया :

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या वाक्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची गोष्टी समजण्याची, त्याकडे पाहण्याची क्षमता वेगवेगळी असते. पण इतक्या साध्या गोष्टीवरूनही ट्विटरवर झालेला हा पोल नक्कीच हास्यास्पद प्रकार आहे.