केंद्रप्रमुख पदभरतीला सरकारची मान्यता



राज्यात कित्येक दिवसांपासून अडकून पडलेली केंद्रप्रमुख पद भरती अखेर निकाली निघाली असून काल 1 डिसेंबर रोजी केंद्रप्रमुख भरती संदर्भात शासन निर्णय पारीत करण्यात आला आहे.


केंद्रप्रमुखांची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी या कारणांनी या पुढील रिक्त होणार्‍या पदांवर ती पदे जसजशी रिक्त होतील तसतशी 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्यपरिषदेमार्फत घेतली गजाणार आहे.


अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी असेल. ही परीक्षा 200 गुणांची असेल. कमाल वयोमर्यादी 50 वर्षे असेल.