Pradhanmantri Awas Yojna खास धनगर समाजासाठी शासनाने आणली घरकूल योजना -

पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांना कायमस्वरूपी एकाच जागेवर स्थायिक करण्याचा भाग म्हणून समाजकल्याण विभागाच्या वतीने भटके व धनगर समाजाच्या कुटुंबीयांसाठी शासनाच्या मदतीतून घरकूल उभारून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.



काय आहे योजना?  
Pradhanmantri Awas Yojna


 राज्यामध्ये भटक्या जमातीच्या लोकांचे राहणीमान उंचावणे, तसेच त्यांच्या जीवनात स्थिरता आणून त्यांचा कौटुंबिक विकास साधणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून, स्वतःच्या नावावर कुठेही घर नसलेल्या बेघरांसाठी शासनाकडून जागा व घरकूल बांधून देण्याची योजना आहे.


अर्ज कसा कराल
Application for Pradhanmantri Awas Yojna


या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची आणि अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा.


लाभासाठी योजनेचे निकष काय? या योजनेसाठी गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, स्वतःच्या मालकीचे घर नसावे. राज्याचा रहिवासी असावा. कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा.



चार हप्त्यांत मिळणार एक लाख २० हजार रुपये


समाज कल्याण विभागाकडून या योजनेचे परिचालन होत असले तरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याचे निधीचे वितरण व नियंत्रण केले जाते. साधारणतः चार हप्त्यात घरकुलाची रक्कम अदा केली जाते. त्यात पहिला इसा १५, नंतर ४० व ४५ व शेवटी २० हजारांचे वाटप केले जाते.
योजनेच्या प्रचाराला यंत्रणा अयशस्वी भटक्या व विमुक्त समाजाला स्थैर्य मिळवून देणाऱ्या या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरला आहे.



समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबविली जाते. त्यांच्यामार्फत त्याचा प्रचार व प्रसार होणे अपेक्षित आहे. 

लाभार्थी थेट समाज कल्याण कार्यालयाकडे घरकुलासाठी अर्ज करू शकतो.


 तालुकापातळीवर पंचायत समितीमार्फत या संदर्भातील प्रस्ताव समाज कल्याणला पाठविले जातात.


 त्यानंतर मंजूर यादी ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाल्यावर त्याची अंमलबाजवणी सुरु होते- आनंद पिंगळे, प्रकल्प संचालक