एका निर्दयी आजोबाने आपल्या पाच वर्षाच्या नातवाचा जीव घेतल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील तीन चारी वस्ती येथे हा धक्कादायक प्रकार घडला. आई-वडील संभाळत नाही म्हणून आजोबाकडे असलेल्या नातवाचा ६० वर्षीय आजोबाने गुरुवारी रात्री निर्घुण खून केला.
चासनळी येथील चांदगुडे वस्तीवरील रहिवासी असलेला व्यसनी आरोपी आजोबा चंदर उर्फ चंद्रभान देवराम गोधडे (वय वर्ष -५०) यांने अज्ञात कारणावरून त्याचा नातू चि.अथर्व अनिल गायकवाड (वय-०६) यास गंभीर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी नविन आदिवासी स्मशानभुमीत त्याचे प्रेत परस्पर दफन केल्याची घटना उघड झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी चंदर उर्फ चंद्रभान गोधडे हा आपल्या नातवाला घेऊन रहात होता.मयत मुलाचे वडील व आजी या पूर्वीच मयत झालेली असून आईने नवरा मयत झाल्याने काही कालावधीत दुसरे लग्न केलेले आहे. व ती दुसऱ्या नवऱ्याकडे नांदत आहे. त्यामुळे नातू आणि आजोबा असे दोघे जण राहत होते.
चासनळी येथील शेतकरी विलास चांदगुडे यांचे शेतात शेतमजुरी राहत होता.
सदर मुलाला आजोबा चंद्रभान गोधडे याने आपल्या नातू अथर्व गायकवाड यास काठीने व हाताने मारहाण करून त्यास दि.३१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवघड जागी मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे.
व पुरावे नष्ठ करण्यासाठी त्याचे प्रेत नवीन आदिवासी स्मशान भूमीत परस्पर दफन केले होते हि घटना त्याची खबर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना लागल्याने गावातील पोलीस पाटील प्रकाश रंगनाथ शिंदे यांनीं त्यानुसार त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला.
सदर मुलाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
सदर नरबळी चा प्रकार आहे का? असे विचारले असता पोलिसानी त्याचा इन्कार केला आहे.