मराठा समजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी राजे छत्रपती यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना भेटलेल्या पाठिंब्यामुळे आणि मराठा समाजात वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्र शासन चारच दिवसात मागण्या मान्य करण्यास मान्य झाले.
Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati
Maharashtra Government On Maratha Community Demands
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या ची माहिती जनसमुदायाला दिली. नगरविकास मंत्री शिंदे यांनी आझाद मैदान येथे उपस्थित असलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांपुढे मागण्या वाचून दाखविल्या.
Demands Of Maratha Community
मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य
1. मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. दरम्यान या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. SEBC Reservation Maratha
2. मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार. Maratha Community Jobs
3. सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार Sarthi Vision Document
4. सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार. Recruitment in Sarthi
5. सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
6. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार. Annasaheb Patil Loan
7. मराठा समाजातील बांधवांना व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवी पॉलीसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे. Loan interest returns
8. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थासाठी पूर्णवेळ महासंचालक, तसंच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु. Annasaheb Patil Loan
9. विविध जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु, तसंच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचं गुढीपाढव्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करु. Maratha Community Hostel
10. कोपर्डी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार. Kopardi Court Case
11. मराठा आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊ, प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येतील.
12. मराठा आंदोलनात मृत आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्र पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ. Government Jobs For Maratha Community
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी नुकतंच हे उपोषण सोडलं असून राज्यसरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.