'या' जिल्हयातील पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

राज्यात शाळा सुरु (school reopen) झालेल्या आहेत. पुण्यातही करोनाचा (ccovid19) संसर्ग कमी झाल्याचे पाहून शाळा (Pune School) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्ण दिवस सुरु करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी दिली. आज त्यांनी पुण्यातील करोना स्थितीची आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग पूर्ण वेळ भरवण्यात येणार आहेत.
तसेच जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे द्या चौकशी करून सिद्ध झालं तर कारवाई करणार असल्याचं प्रत्युत्तर अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे. मला या गोष्टीत रस नाहीय रोज नुसते आरोप प्रत्यारोप सुरुय, नंतर माफी मागितली जातेय, बंडातात्या कराडकर यांचे नाव न घेता अजित पवार यांनी हा टोला लगावला. मला अशा कोणत्याही प्रकरणात इंटरेस्ट नाही, राज्यकर्ते म्हणून ज्यांची जबाबदारी असेल त्यांनी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजची करोनाचा परिस्थिती पाहता आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात आणि जगात हिच परिस्थिती आहे. यावर टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कदम म्हणाले की, या परिस्थितीमागे काय कारण आहे हे आम्हीसुद्धी शोधतोय कारण गेले काही दिवस रुग्णसंख्येत वाढ नाही मात्र कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथील करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.