दैनिक लोकमतने नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या मुद्यावर मोहन भागवत यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.
'देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. धारण करणारा नियम म्हणजे धर्म आहे. हिंदू हा धर्म नाही, तो सनातन काळापासून चाललेली परंपरा आहे. आचरण केलेली पद्धत आहे. हिंदू हे इझम नाही. सनातन काळापासून सुरू असलेला सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो, असं मोहन भागवत म्हणाले.
तसंच, हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हा कोणताही धर्म नाही, आचारणा आणलेली परंपरा आहे. देशात आज बंधुभाव आणि विविधतेतील एकता आजही टिकून आहे,
त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा विषय नाही, तुम्ही मान्य करा किंवा नका करू भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असंही भागवत म्हणाले.
परिस्थितीनुसार आचार विचार बदलत असता, त्यामुळे या परिस्थितीमुळे आचार धर्म बदलत राहतो. याला चिकटून राहणे चुकीचे आहे, काळानुसार बदल घडत असतो, तो स्वीकारणे काळाची गरज आहे. प्राचीन काळापासून अनेक पद्धती, रिती आणि परंपरा चालत येत आहे.
यात आता बदल झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे. म्हणून हिंदूत्व शाश्वत आहे, आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती आहे, त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे, असंही भागवत म्हणाले