याबाबत अजितानंद पावसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व गटविकास अधिकारी Block Development Officer व पंचायत समिती सदस्य यांना सर्वांना निवेदन दिले आहे, त्यात त्यांनी म्हंटले आहे की, ४ एप्रिल २०२० रोजी पंचायत समिती श्रीरामपूर येथे रुजू झालो होतो, ऑक्टॉबर २०२० मध्ये आपल्याला गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कामकाज बघण्याचा आदेश प्राप्त झाला. सर्व कार्यालयीन कामकाजाची स्वीकृती दर्शवत मध्यंतरीच्या कालखंडात इतर अनुभवी विस्तार अधिकारी हे संबंधित जबाबदार अधिकारी यांना चार्ज किंवा आदेश न देता फक्त आपल्याला आदेश केले जातात असे त्यांनी म्हंटले आहे .
पंचायत समिती श्रीरामपूरमधील वरिष्ठ अधिकारी वैयक्तिक त्रास देण्या हेतू आपल्याला आदेश करतात. सातत्याने वैयक्तिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे देखील त्यांनी लिहिले आहे.
याबाबत १५ दिवसांत निर्णय होत नाही, तोपर्यंत रजेवर जात आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी अन्यथा २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद अहमदनगर मुख्यालयासमोर आत्मदहन करीन, असा इशाराच त्यांनी दिला आहे.