Teachers Accidental Dealth कारच्या धडकेत 2 शिक्षिकांचा मृत्यू

शतपावलीसाठी जाणार्‍या दोन शिक्षिकांचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारस पुणे-नाशिक महामार्गवरील बोटा बायपासजवळ झाला. सुनीता रामदास माकोडे व नंदा रामनाथ पारधी असे मृत्यू झालेला शिक्षिकेंची नावे आहेत. या अपघाती घटनेने बोटा गावावर शोककळा पसरली आहे.

शिक्षिका सुनीता रामदास माकोडे व सेवानिवृत्त शिक्षिका नंदा रामनाथ पारधी नेहमीप्रमाणे आपल्या घरापासून जवळ असलेल्या बोटा बायपास जवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शतपावली करत असताना त्याच दरम्यान संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणार्‍या कारने त्यांना जोराची धडक दिली. यावेळी सुनीता माकोडे या जागीच ठार झाल्या तर नंदा पारधी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शिक्षकेला आळेफाटा येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही शिक्षिकांच्या अपघाती मृत्यूने बोटा गावावर शोककळा पसरली आहे.