कोर्‍हाळ्यातील 'त्या' बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. तो तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. तशी राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्याच्या घरच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेतला होता.
तो मिळून आला नाही. काल तासकर वस्तीपासून काही अंतरावर बबलू हरिभाऊ बनकर यांच्या विहिरीत निखिलचा मृतदेह पालथ्या स्थितीत आढळून आला. बनकर हे आपल्या शेतातील गट नंबर 966 मधील विहिरीकडे जनावरांना पाणी पिण्यासाठी विहिरीकडे घेऊन गेले होते. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता निखिलचा मृतदेह विहिरीत पालथ्या स्थितीत त्यांना दिसून आला. त्यावरून त्यांनी राहाता पोलिसांना याबाबतची खबर दिली. त्यांची खबरीवरून राहाता पोलिसांना घटनास्थळी भेट देऊन आकास्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 6/2022 कलम 174 प्रमाणे दाखल केला आहे. राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँस्टेबल पंकज व्यवारे पुढील तपास करत आहे.