Shivaji Maharaj Pohegaon पोहेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची जल्लोषात स्थापना

महिला मंडळाची टिपरी, लेझीम पथक, ढोल ताशे, डीजेच्या तालावर तरुणांचा जल्लोष होत मराठमोळ्या पद्धतीने हिंदू संस्कृतीला शोभेल अशा पद्धतीने भजनी मंडळांचा टाळ मृदुंगाच्या गजरात महाराजांचे भव्य आगमन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ झाले. गिरीश जोशी गुरू यांनी वैदीक पध्दतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पूजन केले.
यावेळी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, रमेश झांबरे, अशोक औताडे, दादासाहेब औताडे, विलास रत्ने, सरपंच संजय गुरसळ, काका शिंदे,अंकीत औताडे, निखिल औताडे, नंदकुमार औताडे,प्रवीण गायकवाड, रवी चौधरी, सुनील पवार, राहुल औताडे,ज्ञानेश्वर औताडे, राजेंद्र औताडे, सचिन वाके, संदीप औताडे, अंकित औताडे, गौरव औताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुनील लोखंडे,ज्ञानदेव वाके, विनायक मुजगुले, विनायक औताडे, माधव गायकवाड, दिगंबर पवार आदींसह राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येणार्‍या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे मार्गदर्शक नितीनराव औताडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सूत्रसंचालन राजेंद्र औताडे यांनी केले तर आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.