‘पुष्पा’ चित्रपटातील ‘हे’ गाणं आता भजन मंडळाने केलं व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडीओ पाहा..


साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाची जादू जगभर पाहायला मिळत आहे. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या (Stylish star allu arjun) चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी इन्स्टा रील्स आणि युट्युब शॉर्ट्स अगदी भरभरून वाहत आहे

पुष्पा द राईज पार्ट-1 हा चित्रपट लाल चंदनाची तस्करी आणि त्यामागची करोडो रुपयांची उलाढाल यावर आधारित आहे. चित्रपटातील कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांवर रील्स आणि फनी व्हिडिओ बनवले जात आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक मंडळ भजन कीर्तन करताना दिसत आहे. आता या व्हिडिओत गंमत अशी की, यातील भजन मंडळाने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली (Srivalli Song) गाणं गायलं आहे आणि त्यावर जे वादन केलं आहे ते अतिशय वेगळेपण देत आहे. अनेक जणांनी हा व्हिडीओ व्हायरल केलाय.


तबल्याच्या तालावर आणि सोबत ढोलकीच्या आवाजावर श्रीवल्ली गाण्याचं भजन व्हर्जनही सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. व्हिडिओला जबरदस्त लाईक आणि शेअर्स तसेच कमेंट बॉक्समध्ये अतिशय मनोरंजक प्रतिक्रियाही देत आहेत. अलिकडेच या गाण्याचं मराठी व्हर्जनही जोरदार व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. ‘पुष्पा’ चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी ही प्रसिद्ध होत आहेत की अनेक सेलिब्रिटीही त्यावर व्हिडिओ बनवून पोस्ट करत आहे.