धारणगावमध्ये ५४ लाखाच्या रस्त्यांचे काम सुरु
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या निधीतून अनेक गावात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून अनेक रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ होत आहे.
धारणगाव येथे देखील २४ लक्ष रुपये निधीतून अण्णासाहेब वहाडणे घर ते मंगेश जिरे घर रस्ता खडीकरण करणे
व
३० लक्ष रुपये निधीतून धारणगाव-ब्राह्मणगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण
कामाचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होवून नागरिकांना रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता होणार आहे.
त्यामुळे या रस्त्यांचा दळणवळणासाठी नियमित वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून या नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य श्रावण आसने, सरपंच नानासाहेब चौधरी, उपसरपंच गोरक्षनाथ चौधरी, रावसाहेब चौधरी, गौतम बँकेचे संचालक साहेबलाल शेख, सोपानराव वहाडणे, नानासाहेब दवंगे, शिवाजी चौधरी, निखील जाधव, राजेंद्र जाधव, भिमाजी वाकचौरे, रामनाथ रणशूर, बाळासाहेब रणशूर,
नानासाहेब चौधरी, अण्णासाहेब वहाडणे, सिताराम सुरे, निळूबाजी रणशूर, साहेबराव दवंडे, अशोक सुरे, रघुनाथ जाधव, माधवराव पानसरे, राजेंद्र चौधरी, छबुराव थोरात, अनिल थोरात, लक्ष्मण डमाळे, तुकाराम हुळेकर, सोपानराव थोरात, दत्तात्रय जोंधळे, समशेर शेख, केशव चौधरी, सुनील जाधव, सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता लाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढे, ग्रामसेविका श्रीमती आहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.