टाकळी ग्रामपंचायत वतीने नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी
कोपरगाव प्रतिनिधी -: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते
सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम टाकळी ग्रामपंचायत सरपंच संदिप देवकर यांच्या मार्गदर्शनातुन टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही नागरिकांचे आरोग्य मोफत नेत्र तपासणी केली असल्याचे प्रतिपादन टाकळी ग्रामपंचायत सरपंच संदिप देवकर यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच संदिप देवकर ,संजय देवकर उपसरपंच,मालकर लखन, डॉ हर्षल पाटक ,डॉ कैलाश भड, गोरख देवकर,बद्रिनाथ देवकर व ग्रामस्थ उपस्थित होते