रेडी रेकनरच्या दराबाबत सरकारने उद्यापासून घेतला हा महत्त्वाचा निर्णय…

रेडी रेकनरच्या दराबाबत सरकारने उद्यापासून घेतला हा महत्त्वाचा निर्णय…

मुंबई प्रतिनिधी -: राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची किमान किंमत राज्य शासनाद्वारे ठरविली जाते, याला रेडी रेकनर दर म्हणतात. उद्या १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात या रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कात कोणताही बदल होणार नाही.

 

सरकारकडून दरवर्षी त्या-त्या भागातील म्हणजेच औद्योगिक, शेती, रहिवासी भागातील संबंधित बाबीच्या संशोधनावरून राज्य शासन हे दर निश्चित करत असते. गेल्या तीन वर्षात या दरात कोणताही बदल करण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाकडून या दरात कोणती वाढ करण्यात न आल्याने सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.