💵 शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १२व्या हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहे.
त्यासाठी १७ ऑक्टोबर तारीख निश्चित केली आहे. पंतप्रधानांच्या एका क्लिकनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन रक्कम जमा होईल. मात्र, यावेळी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याला मुकावे लागणार आहे.
🧾 पोर्टलवर यादी अपलोड
पीएम किसान पोर्टलवर पीएम किसानचा १२वा हप्ता मिळणार असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नावांची यादी अपलोड करण्यात आली आहे.
📲 १२व्या हप्त्याचे पैसे पाठवण्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थी शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून त्यांची स्थिती तपासू शकणार नाहीत. आता नव्या नियमानुसार शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच स्थिती तपासता येणार आहे.