एका तरूणाने आपल्या सख्ख्या मावस बहिणीवर च वेळोवेळी शारिरीक अत्याचार केला.
Web Title - Physical torture by Cousin Brother On Sister - The incident come to light after the young woman noticed that she is pregnant
यात ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली तसेच त्या आरोपीचा 3 महिन्यांपूर्वीच रस्ता अपघातात मृत्यू झालेला आहे.
या गंभीर घटनेने राहुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
एप्रिल 2021 म्हणजेच एक वर्षापासुन वेळोवेळी 16 वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर तिच्या सख्ख्या मावस भावाने अत्याचार केला.
काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागले त्यामुळे तिला राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, त्यावेळी
ती गर्भवती असल्याचे लक्षात आले.
परंतु 16 वर्षीय मुलीच्या नातेवाईकांची तक्रार देण्याची तयारी नसल्याने तेथील डॉ. जयंत कुलकर्णी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेतील आरोपीचा तीन महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये रस्ता अपघातात मृत्यू झालेला आहे.
डॉ. जयंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून मयत आरोपीवर पोस्को अंतर्गत शारिरीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.