Kolpewadi Cricket : कोळपेवाडी येथे राष्ट्रवादी चषकाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न; पोलिसांनी मैदानात उतरून केली फटकेबाजी


कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे महेश्व्रर ग्रुप आणि बजरंग ग्रुप यांच्या वतीने राष्ट्रवादी चषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, 



दि 10 मे पासून या स्पर्धाना प्रारंभ झाला होता या स्पर्धेमध्ये कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला होता.

 या स्पर्धेचा अंतिम सामना 22 मे रोजी महेश्वर क्रिकेट क्लब आणि वाल्मीकआप्पा मित्र मंडळ क्रिकेट क्लब यांच्यात खेळवला गेला असून रोमांचक सामन्यात महेश्वर क्रिकेट संघाने विजय मिळवत 


 राष्ट्रवादी चषकावर आपले नाव कोरले आहे. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.        
 या स्पर्धेत प्रथम क्रमांक महेश्व्रर ग्रुप ने मिळवला असून 41 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे

 द्वितीय क्रमांक वाल्मिक अप्पा मित्र मंडळ सुरेगाव यांनी मिळवले असून 31 हजाराचे पारितोषिक पटकावले आहे, 


तृतीय क्रमांक मोहमदीया संघ शहाजापूर यांनी मिळवले असून 21 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे 

तर चतुर्थ क्रमांक मोरया क्रिकेट क्लब गौतमनगर सुरेगाव यांनी मिळवले असून 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.



यावेळी बेस्ट बॅट्समन वाल्मिक राजगुरू,


बेस्ट बॉलर अभय कोळपे,

मॅन ऑफ दि सिरीज दादू शिंदे व रमजान यांना देखील उत्कृष्ट बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.



दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व ग्रामीण चे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव


 यांनी मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

या प्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण चे निरीक्षक दौलतराव जाधव,



यांनी मैदानात फटाके बाजी केली यावेळी कोलपेवाडी चे सरपंच सूर्यभान कोळपे माजी सभापती वाल्मिकअप्पा कोळपे,



बजरंग ग्रुपचे अध्यक्ष राजू नाना कोळपे सर्व पत्रकार,कोळपेवाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.