या मयत मुलीच्या कुटुंबात तिच्यासह आई,वडील,एक लहान भाऊ असा छोटासा परिवार आहे व एका मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे.
दि.०१ मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिच्या घरातील आई वैजापूर vaijapur ला गेलेली होती तर तिचे वडील बोलकी गावात काहीतरी कामासाठी गेलेले होते
आणि
तिचा लहान भाऊ गाई साठी उसाचे वाढे आणण्यासाठी गेलेला असताना तिने घरात कोणी नाही हे बघून घरातील छताला साडीची दोरी करत त्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
प्रथम घरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले.
या घटनेबाबत तिने कुठलीही आत्महत्या प्रकरणी चिट्ठी लिहून ठेवलेली नाही
त्या बाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
तिने आत्महत्या का केली याचे कोडे कोपरगाव तालुका पोलीस प्रशासनास पडले आहे. Kopargaon Police