टोमॅटोच्या 10 बिघ्यातून कमावले 12 लाख रूपये ; वापरली 'ही' आयडिया !


जगात शेती ही अनेक देशांत केली जाते. कोणत्याही देशांतील व्यक्तीला अन्नधान्य आणि फळे, फुले, भाजीपाला हे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. भारतात शेतीकडे नकारात्मक म्हणून पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये, हे आपल्याला माहीतच असेल. अत्याधुनिक यंत्र व अवजारे वापरून आपण काही आयडिया वापरून शेतीतून जरी कमी उत्पन्न काढलं, पण जे उत्पादन निघतं त्याचं आपण काय करतो हे महत्वाचे असते.
आज जाणून घेऊ एका महिलेची सक्सेस स्टोरी.. 

महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेताना दिसत आहे. शेतीपासून वेगवेगळ्या क्षेत्रात महिला नवे विक्रम घडवत आहेत. आम्ही तुम्हाला जी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, ती आहे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील. एका महिलेने शेती मध्ये नवा रचला इतिहास आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील या महिलेने टोमॅटोची लागवड करायची ठरवले. पैसे नसतानाही लगेचच ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत महिला गटाद्वारे कर्ज घेतले.
शेती करायचीच म्हटल्यावर महिला गटाद्वारे तब्बल एक लाख रुपये कर्ज घेऊन त्यांनी 10 बिघे जमीन घेतली आणि त्यावर टोमॅटोची लागवड सुरू केली. टोमॅटोच्या लागवडीमधून बघता बघता त्यांना बंपर उत्पन्न मिळाले, ज्यातून मार्केटला विकून आणि थोडासा व्यवसाय करून त्यांना 12 लाख रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळाली.
आपल्याकडे एक पद्धत आहे सारख्या गोष्टी करण्याची आणि संपूर्ण परिसर भारावून गेला असता हे पाहून इतर शेतकऱ्यांनीही त्या महिलेच्या पावलावर पाऊल ठेवून लगेच टोमॅटो लागवड करण्यास सुरुवात केली. आपल्या देशात खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येते, हे माहीतच असेल. टोमॅटोमध्ये अ, ब, आणि क जीवनसत्व (Vitamin A, B, C), कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (phosphorus) तसेच लोह (Iron) इत्यादी पोषक अन्नद्रव्येही टोमॅटो सारख्या पिकात चांगल्या प्रमाणात असतात.

आता प्रश्न पडतो लाखो रुपये कमवायचे कसे?
टोमॅटोच्या पिकलेल्या फळापासुन सुप, सॉस, केचप, जाम, ज्युस, चटणी (Tomato sauces, soup, ketchup, jam, chatni) इत्यादी पदार्थ बनविता येतात. तुम्ही कदाचित हा विचार केला नसेल की, इतके सर्व पदार्थ आपण बनवू शकतो. खरं तर टोमॅटोपासून हे सर्व पदार्थ जर बनवून आपण व्हाईट लेबलिंग (आपण तयार केलेली उत्पादने मोठ्या कंपन्यांना विकणे, ते आपली उत्पादने त्यांच्या नावाने विकतील) जरी केलं तरी खूप पैसा कमावता येऊ शकतो.

टोमॅटो या एकाच पिकापासून आपण हे सगळं विकू शकतो. गूगल सर्च किंवा यूट्यूबवर सर्च केलं की उत्पादन वाढवणे, मार्केटमध्ये व्यवसाय वाढवणे, फायदा किंवा मार्जिन काढणे, गावातील उत्पादने शहरात स्वतःच्या वाहनाने पोहोचविणे किंवा ट्रान्स्पोर्टिंगबद्दल सगळी माहीती भेटेल. टोमॅटोच्या आंबट स्वादाने ते चटपटीत खायला लागणाऱ्या लोकांसाठी आवडीचे ठरते.